Thursday, 4 July 2013

Lolak

लोलक…

देवळातील झुमबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून ,
तसी दिसू लागली माणस माणसा सारखी ,
गवत पुन्हा हिरव दिसू लागल, आकाश पुन्हा निळ,
परवा खूप खूप दिवसांनी एक चिमुरडी धावत आली आणि म्हणाली,
तुला माहितीये....
गवत नसत नुसतच हिरव,आकाश नसत नुसतच निळ,
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली....वाटल...
तो हरवलेला लोलक हिला बर कुठे सापडला....
त्या देवळातील झुंबरला असे अजून किती लोलक आहेत कोणास ठाऊक.

खर तर हा जो झुम्बरातला लोलक आहे ना, तो माणसा च्या जिवंतपणाच लक्षण आहे, मनाची तीव्रता आहे. आपल्या नजरेस पडणारी प्रत्येक लहानसान गोष्ट जी आपण पाहतो, ऐकतो...त्यातून निघणार्या  लहरीच प्रतिबिंब आहे, रोज घडणार्या असंख्य घटना असतात मग त्या घरातल्या असोत, ऑफिस मधल्या असोत किवा बाहेर च्या असोत एक तर अश्या गोष्टी सोडून देतो किवा मग तसीच बुद्धीच्या नजरेतून सोडवण्याचा प्रयत्न करतो.
पण तो लोलक काही दिसत नाही.....कदाचित ती घटना थांबवत आली असती...
कोणीतरी काही तरी पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करतोय...खरतर ती दुर्लक्षित किवा माझ्या उपयोगाची नाही किवा मला वेळ नाही महणून टाळणे सोप आहे पण तो लोलक कायम सोबत असू देत ....पुढे जून नक्कीच पाचाताप नाही होणार..ती नजर कायमची जागी असू देत...ती नजर म्हंजेच त्या  झुम्बरातला लोलक आहे, जिवंतपणाचा तो जागर आहे.
.......................यशवंत

Monday, 18 July 2011

आनंदाच्या वळणावर...

आनंदाच्या वळणावर...  
आनंदाच्या वळणावर...   हल्ली अशी माणसं दुिमर्ळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तबारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा. नव्वद
-पंच्याण्णव टक्के िमळवून सुद्धा लांब चेहरेकरून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात ूवेश िमळेपयर्ंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे. आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असेझालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !माझ्याकडेवेळ नाही, माझ्याकडेपैसेनाहीतआज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ -आनंद लांबणीवरÕ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हेआधी मान्य करू या.काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद िमळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगढयाच्या फुलांचा गंध घ्यायला िकतीसा वेळ लागतो ? सूयोर्दय-सूयार्ःत पाहायला किती पैसेपडतात ? , कोण मरायला येणारेतुमच्याशी  स्पर्धा करायला ? ? सोप्पंआहे - भिजायला जा !! 
खुप िदवसांनी एका आनंदी आिण समाधानी माणसाला भेटलो होतो.
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला मूड लागतो ...
खर तर ........
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात. परमेश्वरानेएका हातात 'आनंद' आिण एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलंअसतं. माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आिण 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी कोणावरÕ तरी, ‘कशावरÕ तरी अवलंबून राहावंलागतं. -कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर. काहीतरी िमळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर. 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आिण मन सोक्त डुंबावं. इतकं असून...आपण सगळेत्या झढयाच्या काठावर उभेआहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत ! जोवर हेवाट बघणंआहेतोवर ही तहान भागणंअशक्य ! इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोिजशन', आणखी टक्के.. ! या  'आणखी'च्या मागेधावता धावता त्या आनंदाच्या झढयापासून िकती लांब आलो आपण

जावेद अख्तर साहेबांनी खूप छान िलहून ठेवलंय –    सबका ख़ुशीसेफासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !

Sunday, 15 May 2011

गर्दीत ले वलन---

मी गर्दीत वाट हुडकतोय.................
रोज सकाळ होते, उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो,शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................ १२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो. अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो  मी पण गर्दीत चालत राहिलो............................ लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, 1/२ स्विच झले, पॅकेज वाढले.मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालोआता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे. एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो. घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला जाउ दे त्याला निवांतमहणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो. आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, ………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, ….... मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय बे कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-भाऊ,आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि असे पण म्हणत नाही, मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही. गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो. आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून? बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.बसस्स.......आता ...ठरवले आहेआणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिलाए हा असा का करतोमी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे. एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आपण काय साध्य करतोय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत?