Thursday, 4 July 2013

Lolak

लोलक…

देवळातील झुमबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून ,
तसी दिसू लागली माणस माणसा सारखी ,
गवत पुन्हा हिरव दिसू लागल, आकाश पुन्हा निळ,
परवा खूप खूप दिवसांनी एक चिमुरडी धावत आली आणि म्हणाली,
तुला माहितीये....
गवत नसत नुसतच हिरव,आकाश नसत नुसतच निळ,
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली....वाटल...
तो हरवलेला लोलक हिला बर कुठे सापडला....
त्या देवळातील झुंबरला असे अजून किती लोलक आहेत कोणास ठाऊक.

खर तर हा जो झुम्बरातला लोलक आहे ना, तो माणसा च्या जिवंतपणाच लक्षण आहे, मनाची तीव्रता आहे. आपल्या नजरेस पडणारी प्रत्येक लहानसान गोष्ट जी आपण पाहतो, ऐकतो...त्यातून निघणार्या  लहरीच प्रतिबिंब आहे, रोज घडणार्या असंख्य घटना असतात मग त्या घरातल्या असोत, ऑफिस मधल्या असोत किवा बाहेर च्या असोत एक तर अश्या गोष्टी सोडून देतो किवा मग तसीच बुद्धीच्या नजरेतून सोडवण्याचा प्रयत्न करतो.
पण तो लोलक काही दिसत नाही.....कदाचित ती घटना थांबवत आली असती...
कोणीतरी काही तरी पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करतोय...खरतर ती दुर्लक्षित किवा माझ्या उपयोगाची नाही किवा मला वेळ नाही महणून टाळणे सोप आहे पण तो लोलक कायम सोबत असू देत ....पुढे जून नक्कीच पाचाताप नाही होणार..ती नजर कायमची जागी असू देत...ती नजर म्हंजेच त्या  झुम्बरातला लोलक आहे, जिवंतपणाचा तो जागर आहे.
.......................यशवंत

No comments:

Post a Comment